अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी कार चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी कार चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 13 मार्च रोजी सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास म्हसवे, ता. सातारा गावच्या हद्दीत पुणे -सातारा हायवे वर रमेश विठ्ठल साबळे रा. संगम माहुली, ता. सातारा याने त्याच्या ताब्यातील अल्टो कार क्र. एमएच 11 एके 8993 भरधाव वेगाने चालवून वैभव रवींद्र पवार राहणार आसनगाव कुमठे तालुका सातारा यांच्या दुचाकीस धडक देऊन वैभव पवार यांना जखमी केले. तसेच त्यांना कोणत्याही प्रकारची मदत न करता तेथून निघून गेले. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक चव्हाण करीत आहेत.