महिलांचे संघटन अधिक मजबूत करुन काँग्रेसची विचारधारा जिल्ह्यात आणखी गतीमान करण्याचे काम माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे सकारात्मक उर्जा मिळाली आहे.
सातारा : महिलांचे संघटन अधिक मजबूत करुन काँग्रेसची विचारधारा जिल्ह्यात आणखी गतीमान करण्याचे काम माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे सकारात्मक उर्जा मिळाली आहे. गावागावात काँग्रेसचे कार्यकर्ते जोडले जात आहेत. जिल्ह्यात महिला काँग्रेस भक्कम करण्यासाठी महिला आघाडीची नव्याने कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा अल्पना यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. अल्पना यादव म्हणाल्या, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या महिला आघाडीचे काम सक्षमपणे सुरु आहे. आज महिला कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. त्यामध्ये प्रवक्तपदी डॉ. छायादेवी घोरपडे, उपाध्यक्षा म्हणून अरुणा नाझरे, अर्चना पाटील, शारदा भस्मे, गितांजली थोरात, वंदना आचरे, नकुसाताई जाधव, सरचिटणीसपदी विजया माने, राजलक्ष्मी पाटणकर, वंदना कोरडे, सारिका निकम, सदस्यपदी विद्या थोरवडे, उर्मिला जगदाळे, प्रतिक्षा पाटील, नंदा खंदारे आदींची निवड करण्यात आलेली आहे.