मित्रांनो दैनंदिन जीवनात अश्या बर्याच गोष्टी घडत असतात ज्याचा कायद्याशी संबंध येतो. त्याबद्दलची माहिती घेण्यासाठी आपण कायद्याची पुस्तके, लेख वाचण्याचा प्रयत्न करतो परंतु त्यांची भाषा आपणास समजणारी नसते. मग दूसरा पर्याय असतो तो वकिलांचे मार्गदर्शन घेण्याचा, परंतु बहुतेक वेळा आपणास त्यांची फिस परवडणारी नसते. त्यामुळे आपण कायद्याची माहिती देणारे आणि विशेष म्हणजे ती माहिती सामान्य व्यक्तिला समजेल अश्या भाषेत असणारे लेख वेळोवेळी आपल्या esahas.com या वेबसाईटवर प्रसिद्ध करतो. जेणेकरून आपल्या हक्कांची, कायद्याची माहिती सामान्य लोकांना समजेल. ही माहिती आपणास फायदेशीर वाटली तर नक्की शेअर करा.
आजच्या या लेखात आपण पाहणार आहोत की चेक बाउन्स प्रकरणांमध्ये जर तुम्ही आरोपी असाल तर तुम्हाला कोणकोणते बचावाचे मार्ग उपलब्ध असतात? ज्यामुळे तुम्ही या प्रकरणातून निर्दोष मुक्त होऊ शकता. कदाचित आपल्यापैकी खूप कमी जणांना याबद्दलची माहिती असेल की चेक बाऊन्स प्रकरणातून निर्दोष मुक्त होणे खूप कठीण असते, कारण या प्रकारच्या केसमध्ये तुम्हास बचावासाठी जास्त पर्याय उपलब्ध नसतात. फक्त आणि फक्त काही तांत्रिक बाबींचा बचाव आपण घेऊ शकता. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की चेक बाउन्स हा गुन्हा होण्यासाठी कोण कोणत्या अटी असतात?
(1) सर्वप्रथम दिलेला चेक हा दिलेल्या तारखेपासून तीन महिन्याच्या आत बँकेत भरणा करावयाचा असतो. (2) त्यानंतर जर तो चेक न वटता परत आला तर फिर्यादीने त्या चेक वरील रक्कम मागण्याची नोटीस 30 दिवसांच्या आत पाठवावी लागते. हे 30 दिवस चेक बँकेतून परत आल्यापासून मोजले जातात. (3) नंतर आरोपीने ती नोटीस मिळाल्यापासून 15 दिवसांच्या आत पैसे देणे गरजेचे असते. या 3 महत्वाच्या अटी पूर्ण झाल्यानंतर चेक बाऊन्स ची केस फिर्यादी दाखल करू शकतो.
नोटिस : आता समजा आपल्यावर अश्या प्रकारचा चेक बाऊन्सचा गुन्हा दाखल झाला, तर कोण कोणत्या प्रकारे आपण आपला बचाव मांडू शकतो हे जाणून घेऊया. याची सुरुवात नोटीस देणे पासून होते. त्यामुळे जेंव्हा फिर्यादी आरोपीला पंधरा दिवस आगोदर नोटिस पाठवतात, त्या नोटीसला तुम्ही तुमच्या बचावाचे उत्तर दिले पाहिजे. काही लोक आलेल्या नोटिसला जास्त गांभीर्याने घेत नाहीत, आणि अडचणीत येऊन बसतात. त्यामुळे आलेल्या नोटीसला योग्य त्या बचावाचे उत्तर दिले तर भविष्यात जरी केस दाखल झाली तरी आरोपीला जास्त अडचणी येत नाहीत.
दिलेला चेक हा सिक्युरिटी म्हणून दिलेला असेल तर? : आपण व्यापारी असाल तर दुसर्या व्यापाऱ्याकडून जो काही माल अथवा सामान उधारीवर घेत असाल तर तुम्हाला ते व्यापारी त्याच्या उधारीचा पैशाच्या बदल्यात सिक्युरिटी चेक मागत असतात. अश्या परिस्थिति मध्ये जर त्या व्यापर्याने तो चेक बँकेत भरला तर तुम्ही त्या चेकची रक्कम त्याला देणे लागत नाही. अशा प्रकारे सिक्युरिटीचा बचाव घेऊन तुम्ही तुमची केस जिंकू शकता, परंतु हे एवढेही सोपे नाही. कोर्टात तुमच्या वकिलांनी फिर्यादीच्या तोंडून असा सिक्युरिटी चेक दिल्याबद्दल वधवून घ्यावे लागते.
बेहिशोबी पैसा : जर बेहिशोबी पैशाचा वसूलीसाठी चेकचा वापर केलेला असेल, याबाबत फिर्यादी कोर्टात पुरावे सादर करू शकत नसेल तर अशी केस कोर्टातर्फे काढून टाकली जाते. याबाबत आपण एक उदाहरण पाहूया. आरोपीने फिर्यादी कडून व्याजाने काही पैसे घेतलेले आहेत. अशा परतफेडीसाठी आरोपीने दिलेला चेक बँकेत न वटता परत आला असेल, तर आरोपीच्या वकिलांनी अशी केस चालू असताना कोर्टात हे सिद्ध केले की हा पैसा Unaccounted म्हणजेच बेहिशोबी आहे. अश्या परिस्थितीमध्ये कोर्ट आरोपीला निर्दोष मुक्त करू शकते. हा पैसा बेहिशोबी आहे असे दाखवण्यासाठी आपण पुरावा म्हणून फिर्यादीचा Income Tax Return दाखल करू शकतात.
हस्ताक्षर/सही/तारीख यामधील फरक : फायनान्स कंपनी किंवा काही वित्तीय संस्था कोर्या चेकवर तुमच्या सह्या घेऊन आपल्याकडे ठेऊन घेतात. काही केसेस मध्ये असे पाहायला मिळते की आरोपीचे वकील फिर्यादीला चेक वरील रक्कम, सही, तारीख, नाव यामध्ये पेनच्या शाई मध्ये फरक आहे. अश्या परिस्थितीमध्ये आरोपीच्या अर्जावरून कोर्ट केमिकल ऍनॅलिसिस साठी तो चेक पाठवून देतात. त्याचा अहवाल आल्यानंतर त्या केसची सुनावणी पुन्हा सुरू होते. त्या अहवालामध्ये आरोपीच्या म्हणण्याप्रमाणे शाई मध्ये फरक आढळून आला तर आरोपीची निर्दोष मुक्तता होण्याची शक्यता वाढते.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा


