सातारा जिल्ह्यातून चार वेगवेगळ्या ठिकाणाहून चार अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : सातारा जिल्ह्यातून चार वेगवेगळ्या ठिकाणाहून चार अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 5 डिसेंबर रोजी 7 वाजण्याच्या सुमारास देगाव, ता. सातारा येथील राहत्या घरातून एका अल्पवयीन मुलीचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची तक्रार तिच्या पालकांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. दि. 6 डिसेंबर रोजी 7 वाजण्याच्या सुमारास उडतरे, ता. वाई येथील एका वस्तीवर असणार्या राहत्या घरातून अज्ञात इसमाने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची तक्रार भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. दि.16 रोजी 5 ते 5.30 वाजण्याच्या सुमारास मायणी, ता. खटाव गावच्या हद्दीतील राहत्या घरातून एका अल्पवयीन मुलीचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची तक्रार वडुज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. दुसर्या घटनेत दि. 17 रोजी 5.30 वाजण्याच्या सुमारास सातारा येथील देवी चौक परिसरातून गणेश शंकर जाधव, वय 27, रा. अंबवडे बुद्रुक, ता. सातारा याने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची तक्रार तिच्या पालकांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली.