maharashtra

महिला कॉलेजच्या अनुष्काला आशियाई स्पर्धेत कांस्यपदक


रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. अनुष्का दत्तात्रय कुंभार हिने कुवेत येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ४०० मीटर रनिंग मध्ये कांस्यपदक पटकावले.

सातारा : रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. अनुष्का दत्तात्रय कुंभार हिने कुवेत येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ४०० मीटर रनिंग मध्ये कांस्यपदक पटकावले.
या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव व महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, कला शाखेच्या उपप्राचार्य प्रो. डॉ. सुनिता घार्गे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. एस. एस. पवार, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. स्मिता कुंभार , अंतर्गत गुणवत्ता सुधारक कक्षाच्या प्रमुख डॉ. जयश्री आफळे यांनी अनुष्काचे अभिनंदन केले.
कु.‌अनुष्का कुंभार सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाची आणि रयत शिक्षण संस्थेची शान असून तिचे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गार प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी काढले.
अनुष्काने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेली कामगिरी आमच्यासाठी अभिमानास्पद असून महाविद्यालयाच्या वतीने अनुष्काला सर्वोतोपरी सहकार्य केले जात आहे असेही प्राचार्य डॉ. मेनकुदळे म्हणाले. रयत शिक्षण संस्था अनुष्काच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असून तिने देशाचे नाव आणखी मोठे करावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
अनुष्काचे प्रशिक्षक बळवंत बाबर, अनुष्काचे वडील दत्तात्रय कुंभार यांनी अनुष्काच्या यशासाठी कष्ट घेतले आहेत. सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. स्मिता कुंभार यांनी महिला महाविद्यालयात खेळाडू विद्यार्थिनींकडे विशेष लक्ष देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.