maharashtra

वाठार पोलीस ठाणे हद्दीत दोन ठिकाणांहून सुमारे सव्वा पाच लाख रुपयांचा ऐवज लंपास


वाठार पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडलेल्या दोन चोरीच्या घटनांमध्ये सुमारे सव्वा पाच लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.

सातारा : वाठार पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडलेल्या दोन चोरीच्या घटनांमध्ये सुमारे सव्वा पाच लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 29 जुलै च्या साडेअकरा ते दिनांक 13 ऑगस्ट रोजीच्या साडेदहा वाजण्याच्या सुमारास पिंपोडे बुद्रुक तालुका कोरेगाव गावच्या हद्दीतील रहिवासी असणाऱ्या सौ सारिका संदीप देशमुख (वय ४८) यांच्या राहत्या घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून घरातील बेडरूममध्ये असणाऱ्या लोखंडी कपाटातील लाॅकर मधील सुमारे ५ लाख 16 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. याबाबतची फिर्याद वाठार पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक एस. ए. बनकर अधिक तपास करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत दिनांक 9 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट दरम्यान नांदवळ, तालुका कोरेगाव गावच्या हद्दीतील धरणा जवळील डीपी अज्ञात चोरट्याने खाली पडून त्यातील ऑइल खाली सांडून, त्यातील 80 किलो वजनाची २० हजार रुपये किमतीची तांब्याची तार चोरून नेली आहे. या घटनेची नोंद वॉटर पोलीस ठाण्यात झाले असून याबाबतचा अधिक तपास पोलीस नाईक एम डी चतुरे करीत आहेत. असा एकूण 5 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे.