जेसीबीने दुकानाची तोडफोड केल्याप्रकरणी तिघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : जेसीबीने दुकानाची तोडफोड केल्याप्रकरणी तिघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जेसीबीने दुकानाची तोडफोड करुन त्यातील साहित्य फेकून देवून धक्काबुक्की केली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हिंदुराव पिलोबा बर्गे (वय 81) यांनी चंद्रकांत फडतरे, ऋषीकेश फडतरे यांच्यासह महिलेविरुध्द (सर्व रा. संभाजीनगर, सातारा) तक्रार दिली आहे. ही घटना दि. 9 सप्टेबर रोजी घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.