अंमली पदार्थांची शेती केल्याप्रकरणी तिघांवर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : अंमली पदार्थांची शेती केल्याप्रकरणी तिघांवर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 18 फेब्रुवारी च्या पूर्वी शांताराम रामचंद्र म्होप्रेकर, चंद्रभागा शिवाजी म्होप्रेकर आणि विमल पंढरीनाथ म्होप्रेकर यांनी त्यांच्या शेतात मधोमध गहू हरभरा कांदा पिकाच्या आडोशाला महाराष्ट्र राज्यात बंदी असलेल्या अमली पदार्थ असणाऱ्या अफू पिकाची स्वतःच्या आर्थिक हितासाठी लागवड करून त्याचे संवर्धन व जोपासना केल्याने लागवडीनंतर या पिकास सुमारे दोन ते अडीच फूट उंचीची ओलसर हिरवीगार पाने त्यांना फुले व हिरवी गोलाकार बोंडे लागलेली आढळून आली. हा सर्व माल पोलिसांनी जप्त केला असता त्याचे वजन 75 किलो 480 ग्राम भरले. त्याची बाजारपेठेतील किंमत एक लाख 52 हजार 960 रुपये असून हा माल जप्त करण्यात आला आहे. अंमली पदार्थाची शेती केल्याप्रकरणी संबंधित तिघांवर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.