सातारा : पुणे बंगलोर आशियाई महामार्गवर असणाऱ्या आनेवाडी टोल नाक्यावर आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांच्या दिंड्या आळंदीच्या दिशेने पायी प्रवास करत असून या दिंडी च्या वाहनाना तब्ब्ल एक तास टोलसाठी टोल कर्मचारी अधिकारी यांनी अडवून ठेवले. वारकऱ्यांच्या वाहनाना नेहमी टोल माफी दिली जाते. मात्र तरीही येथील मुजोर अधिकाऱ्यांनी टोल आकारल्याने टोलनाक्यावर गोधळ निर्माण झाला होता,
जिल्ह्याचे सुपुत्र असेलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांना टोल माफी चा आदेश दिला असताना देखील आनेवाडी टोल नाक्यावर वारकऱ्यांना टोल माफी साठी झगडावे लागत होते. त्यामुळेच वारकरी आक्रमक बनले होते. जवळपास दहा वाहने टोलवर तशीच उभी होती. एक तास हा गोंधळ चालू होता, मुख्यमंत्री यांनी या वारकऱ्याच्या वाहनांना टोलवरून मोफत सोडण्याचे आदेश दिले. तरी देखील मुजोर अधिकारी अशा काही आदेशाकडे दुर्लक्ष करत आहेत, स्वतःची मनमानी करत आहेत, यावेळी वारकरी व टोलचे अधिकारी यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांनी वाहतूक सुरळीत करून वारकऱ्यांची वाहने सोडून दिली, यावेळी तात्यासो वासकर कोल्हापूर फड, आप्पासो वासकर, आजरेकर, देहुकर, ह भ प तुकाराम मांडवकर कोल्हापूर, विठ्ठल पाटील, आप्पासो वासकर फड, निवृत्ती महाराज,देहुकर ही प्रमुख मंडळी यावेळी वारकऱ्यासोबत होती, यांना देखील या अधिकाऱ्यांनी अरेरावी केली, त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता..येथील स्थानिक नागरिकांना देखील या अधिकाऱ्यांच्या मुजोरपणामुळे नाहक मनस्ताप भोगावा लागत असतो, दरवेळी शासनाचे आदेश या टोल नाक्यावर पाळले जात नाहीत. त्यामुळे बऱ्याचदा याठिकाणी वाहनधारक व टोल कर्मचारी यांच्यात वादावादी होत असते. शासनाने आनेवाडी टोल बाबत लवकरच निर्णय घेवून टोलच रद्द करावा, अशी मागणी जिल्ह्यातुन होत आहे.