maharashtra

म्हसवड येथील दारु अड्ड्यावर छापा; सुमारे 64 हजारांची दारू हस्तगत


म्हसवड पोलिसांनी दारु अड्ड्यावर छापा मारत सुमारे 64 हजारांची दारू हस्तगत करीत दोघांना नोटीस बजावली आहे.

सातारा : म्हसवड पोलिसांनी दारु अड्ड्यावर छापा मारत सुमारे 64 हजारांची दारू हस्तगत करीत दोघांना नोटीस बजावली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 26 मार्च रोजी वडजल गावच्या हद्दीत असलेल्या प्रथमेश ढाब्याच्या आडोशाला अंकुश हरिबा कारंडे राहणार कारंडेवाडी, तालुका माण आणि अजित ज्ञानदेव गोरड राहणार गट्टेवाडी, तालुका माण हे दोघे अवैधरित्या दारू विक्री करताना आढळून आले. त्यांच्याकडून 63 हजार 585 रुपये किंमतीच्या देशी-विदेशी दारू तसेच बियरच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.