भावानेच मावस बहिणीचा खून करुन स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वांझोळी येथे या खूनाच्या घटनेने एकच खळबळ उडाली.
पुसेसावळी : भावानेच मावस बहिणीचा खून करुन स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वांझोळी येथे या खूनाच्या घटनेने एकच खळबळ उडाली.
बहीण स्नेहल वैभव माळी (वय-२४, सध्या रा. वाझोळी ता.खटाव, मूळ. शामगाव ता.कराड) असे मृत युवतीचे नाव आहे. तर दत्तात्रय माळी (२७) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. काल, रविवारी (दि.२६) रात्री उशिरा ही घटना घडली. शिवाजी विठोबा माळी यांनी याबाबत औंध पोलिस ठाणे फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संशयित आरोपी दत्तात्रय माळी याने स्नेहल वैभव माळी हिला त्याच्या घरी बोलावले. दरम्यान तिच्यावर मानेवर व पोटावर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केला. यानंतर दत्तात्रयने स्वतःही घरातील पंख्याच्या वरील लोखंडी पाखाडीला गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पुसेसावळी व औंध पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र याप्रकरणाची अद्याप नेमकी माहिती समोर आली नाही. कोणत्या कारणातून भावाने हे कृत्य केले हे पोलिस तपासानंतरच समोर येणार आहे. अधिक तपास औंधचे स.पो.नि दत्तात्रय दराडे करीत आहेत.