राजकीय नेत्यांच्या बाबत सकल मराठा समाज नाराज असून राज्यामध्ये आरक्षणाचा विषय खुप मोठ्या प्रमाणावरती वाढला आहे. रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यातूनच वडूथ (ता.सातारा) येथील मराठा बांधवांनी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आल्याचे बॅनर चौकात लावले आहेत.
सातारा : राजकीय नेत्यांच्या बाबत सकल मराठा समाज नाराज असून राज्यामध्ये आरक्षणाचा विषय खुप मोठ्या प्रमाणावरती वाढला आहे. रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यातूनच वडूथ (ता.सातारा) येथील मराठा बांधवांनी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आल्याचे बॅनर चौकात लावले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उभारलेल्या लढ्याला आज संपूर्ण राज्यामध्ये व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. समाजात मराठा आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचे काम करत आहेत. सातारा जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांचा दौरा झाला होता. या दौऱ्यामध्ये त्यांनी शंभूमहादेवाला साकडं घातलं. फलटण आणि दहिवडी येथे विक्रमी सभा घेतल्या. या सभेच्या दुसऱ्याच दिवशी वडूथ ग्रामस्थांनी एकत्र येत सर्वपक्षीय राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आल्याचे बॅनर लावले आहेत. यावेळी मराठा आरक्षणासाठी तसेच न्याय हक्कासाठी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्याचे ठरवले. लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे मराठा बांधवांना आरक्षण मिळत नाही. त्यामुळे सर्वांनी मनोज जरांगे पाटील यांना लाखो मराठा बांधव त्यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरले आहेत.
गावकऱ्यांनी एकत्र येऊन राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील प्रत्येक गावात सदर निर्णयाची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. यावेळी ग्रामस्थांनी "एक मराठा लाख मराठा" च्या घोषणा दिल्या. लवकरात लवकर या सरकारने आरक्षणा बाबत भुमिका स्पष्ट करुन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी वडूथ ग्रामस्थांनी केली आहे.