maharashtra

विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा


विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तिघांवर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तिघांवर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक पाच जुलै 2019 ते 29 जुलै 2022 पर्यंत वेळोवेळी गणेश नगर कोर्टी तालुका कराड येथे सासरी शिवानी सुनील क्षीरसागर यांच्यावर चारित्र्याचा संशय घेऊन व माहेर वरून दहा हजार रुपये घेऊन ये, म्हणून शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केल्याप्रकरणी सुनील अधिक क्षीरसागर, रमा अधिक क्षीरसागर, मालन वसंत क्षीरसागर सर्व राहणार गणेश नगर, कोर्टी, तालुका कराड यांच्यावर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार भोसले करीत आहेत.