अपघातात दोघांना जखमी केल्याप्रकरणी कारचालकाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : अपघातात दोघांना जखमी केल्याप्रकरणी कारचालकाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रामनगर ता.सातारा येथे कारची (एमएच 14 जेयू 3560) दुचाकीला धडक बसली. यात तक्रारदार व त्याच्या मेव्हण्यास दुखापत झाली. दि. 15 नोव्हेबर रोजी ही घटना घडली आहे. याप्रकरणी शिवराम महादेव शेलार (वय 55, रा. खावली, ता. सातारा) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार सचिन भाऊसाहेब घोरपडे (रा. पिंपरी चिंचपड, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.