पोलिसांना माहिती देत असल्याच्या कारणावरून क्षेत्रमाहुली, ता. सातारा येथील कन्स्ट्रक्शन व्यावसायिकाच्या हाताच्या बोटावर वस्तऱ्याने वार केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे.
सातारा : पोलिसांना माहिती देत असल्याच्या कारणावरून क्षेत्रमाहुली, ता. सातारा येथील कन्स्ट्रक्शन व्यावसायिकाच्या हाताच्या बोटावर वस्तऱ्याने वार केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २५ जुलै रोजी ८.३० वाजण्याच्या सुमारास क्षेत्र माहुली येथील सचिन देवकर यांच्या सलुनच्या दुकानात तेथीलच कन्स्ट्रक्शन व्यावसायिक उदय भाऊसाहेब राठोड, वय ३२ हे बसले होते. त्यावेळी त्या ठिकाणी अक्षय आढाव (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) याने त्यांना तू माझ्याबद्दल पोलिसांना माहिती का देतो, असे सांगत त्यांना धमकावून त्यांच्या उजव्या हाताच्या बोटावर वस्तऱ्याने वार केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे.