माणदेशी फार्मसी महाविद्यालयामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
माणदेशी फार्मसी महाविद्यालयामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यासाठी संस्थेचे संस्थापक सचिव प्राध्यापक दादासाहेब कोडलकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नागाराजू पोटनुरी तसेच प्रा. नामदेव शिंदे, रजिस्ट्रार श्री. वैभव महानुर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते. यामध्ये सर्व शिक्षकांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा गौरव करण्यात आला व गुरुपौर्णिमेनिमित्त प्रथम वर्ष बी. फार्मसी ची विद्यार्थिनी आकांक्षा शिंदे तसेच अस्मिता पिंपळे व शिक्षकांमध्ये प्राध्यापक वेताळ कोडलकर, प्रा. राजश्री गोरड प्राचार्य डॉक्टर नागाराजू पोटनुरी व संस्थेचे संस्थापक सचिव दादासाहेब कोडलकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीमध्ये गुरुचे महत्त्व थोडक्यात समजावून सांगितले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद माने, उपाध्यक्ष श्री. बाळकृष्ण लेंगरे, संस्थापक सचिव प्रा. दादासाहेब कोडलकर, उपसचिव डॉ. वैभव माने, खजिनदार श्री. योगीराज लेंगरे यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना गुरुपौर्णिमा निमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सर्व नियोजन प्रथम वर्ष बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी केले. सिआर दादा खांडेकर याने कार्यक्रमाचे सर्व नियोजन केले तर आकांक्षा शिंदे व एलआर अस्मिता पिंपळे हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.