maharashtra
पोलिसाचेच घर चोरट्यांनी फोडले
चार लाख 80 हजार पाचशे रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने केले लंपास
शहरातील एका पोलिसाचेच घर चोरट्यांनी टार्गेट करून घरातील सुमारे पाच लाखांचे दागिने लंपास केले आहेत.
सातारा : शहरातील एका पोलिसाचेच घर चोरट्यांनी टार्गेट करून घरातील सुमारे पाच लाखांचे दागिने लंपास केले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 ते 16 डिसेंबर दरम्यान मूळ वर्ये, तालुका सातारा आणि सध्या शाहूपुरी परिसरात राहणाऱ्या एका पोलिसाच्या वर्ये, तालुका सातारा येथील घराचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी कशाने तरी तोडून, घरात प्रवेश करून बेडरूम मधील लोखंडी कपाटाचे दार उचकटून त्यामध्ये ठेवलेले 4 लाख 80 हजार पाचशे रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले आहेत. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी करीत आहेत.