सुकन्या समृध्दी योजनेसाठी सातारा टपाल विभागाची विशेष मोहिम
प्रवर डाक अधिक्षक अपराजिता म्रिधा यांची माहिती
सातारा टपाल विभागाच्या वतीने सुकन्या समृध्दी योजनेची विशेष मोहीम 29 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या दरम्यान राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत पंचवीस हजार खाती सुरू करणार असल्याचे उदिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती प्रवर डाक अधीक्षक अपराजिता म्रिधा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सातारा : सातारा टपाल विभागाच्या वतीने सुकन्या समृध्दी योजनेची विशेष मोहीम 29 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या दरम्यान राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत पंचवीस हजार खाती सुरू करणार असल्याचे उदिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती प्रवर डाक अधीक्षक अपराजिता म्रिधा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
म्रिधा पुढे म्हणाल्या की, सातारा जिल्ह्यात बालिका सक्षमीकरण ही महत्वाची गोष्ट आहे. दरवर्षी सातारा जिल्ह्यात आठ हजार सुकन्या समृध्दी योजनेअंतर्गत खाती सुरू करण्यात येतात. गेल्या पाच वर्षात जिल्ह्यात सुकन्या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. डाक विभागाच्या वतीने 29 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर 2021 पर्यंत सातारा जिल्हयातील सर्व लहान मोठया गावापर्यंत पोहचून दहा वर्ष वयोगटापर्यंत सर्व मुलींचे सुकन्या समृध्दी खाते उघडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या मोहिमेत बाराशे कर्मचाऱ्यांचा सहभाग टपाल कार्यालयाचे सातशे पोस्टमन घरोघरी जाऊन या योजनेची माहिती देऊन आवश्यक ती कागदपत्रे जमा करून घेण्यात येत आहेत. शून्य ते दहा वयोगटातील मुली खाते उघडण्यास पात्र असून या खात्यांची प्रारंभिक गुंतवणूक अडीचशे रूपये आहे. ही रक्कम पंधरा वर्ष भरावयाची असून मुलगी अठरा वर्षाची झाल्यावर मुदतपूर्व खाते बंद करण्याची सोय आहे. सुकन्या हेल्पलाईनचा 8275700654 हा ग्राहकसेवा क्रमांक असून इच्छुकांनी नजीकच्या टपाल कार्यालय अथवा पोस्टमनशी संपर्क साधण्याचे आवाहन अपराजिता म्रिधा यांनी केले आहे.