maharashtra

विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा


विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांवर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांवर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 27 ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास सुरज हणमंत भोसले, महेश भोसले (पूर्ण नाव माहित नाही), हणमंत शिवाजी भोसले सर्व रा. शिरगाव तालुका वाई यांनी संबंधित विवाहितेचे हात धरून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच विवाहितेच्या पती, सासू, सासरे यांना हाताने व काठीने मारहाण केली. याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस हवालदार धायगुडे अधिक तपास करीत आहेत.