maharashtra

पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा


अल्पवयीन मुलीच्या विनयभंगासह तिला दुखापत केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात पक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा : अल्पवयीन मुलीच्या विनयभंगासह तिला दुखापत केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात पक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तसेच तिला हातातील लोखंडी पाईपने डोक्यात मारून जखमी केल्याप्रकरणी गणेश जनार्धन शेलार रा. कमानी हौदाजवळ, सातारा याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मते करीत आहेत.