maharashtra

नासीर मणेर यांना पदोन्नती

गुवाहाटी शहर जीएसटी महसूल विभागाच्या उपआयुक्त पदी निवड

Promotion to Nasir Maner
खटाव तालुक्यातील ललगुण गावचे सुपुत्र व आसाम येथील सहाय्यक आयुक्त नासीर इकबाल मणेर यांची पदोन्नती होवून उपआयुक्त गुवाहाटी शहर जीएसटी महसूल विभागपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

पुसेगाव : खटाव तालुक्यातील ललगुण गावचे सुपुत्र व आसाम येथील सहाय्यक आयुक्त नासीर इकबाल मणेर यांची पदोन्नती होवून उपआयुक्त गुवाहाटी शहर जीएसटी महसूल विभागपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत मणेर यांनी गुणवत्ता यादीत 753 वा क्रमांक मिळवित उज्चल यश संपादन केले होते. ग्रामीण भागातील नासीर मणेर यांनी यूपीएससी परीक्षेत दैदिप्यमान यश मिळविल्यामुळे सातारचा डंका राज्यामध्ये वाजला होता. ललगुणच्या नासीर मणेर यांचे शालेय शिक्षण जिल्हा परिषद केंद्र शाळा ’ ललगुण येथे झाले. खटाव येथील शहाजीराजे महाविद्यालयात त्यांनी बारावी शास्त्र शाखेपर्यंत व त्यानंतर वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉंलॉजी येथे पदव्युतर शिक्षण घेतले. मणेर यांनी यशादा पुणे येथे राहून यूपीएससी अभ्यासाची तयारी केली. नासीर यांचे वडिल सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत शाखाधिकारी या पदावरून सेवानिवृत झाले आहेत. तसेच नासीर यांच्या आई गृहिणी असून ललगुण येथेच त्या पारंपारीक व्यवसाय करतात.
नासीर मणेर यांची उपआयुक्त वित्त मंत्रालय भारत सरकार या  पदावर पदोन्नती झाली आहे. त्यांच्याकडे आता जीएसटी उप आयुक्त म्हणून आसाम राज्याचे गुवाहाटी , मोरीगाव, नागाव, कर्बि अंग्लोग या जिल्ह्यांचा पदभार असणार आहे.
याबाबत नासीर मणेर म्हणाले की, 2013 साली मॅकेनिकल इंजिनिअर झाल्यानंतर दुबई येथील एका प्रख्यात कंपनीमध्ये मोठया पगाराची नोकरीही मिळाली होती. परंतु मला सामान्य जनतेसाठी काम करायचे असल्याने मी ती नोकरी केली नाही. केंदीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून अखेर पहिल्याच प्रयत्नात प्रशासकीय अधिकारी झालो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी खडतर आणि प्रामाणिक परिश्रम केले, तसेच योग्य मार्गदर्शन मिळाले तर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत निश्चित यश मिळेलए असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.