कोरेगावमधील एका इमारतीत दोन युवकांनी एकाच खोलीत आत्महत्या केल्याने कोरेगावात खळबळ माजली आहे.
सातारा : कोरेगावमधील एका इमारतीत दोन युवकांनी एकाच खोलीत आत्महत्या केल्याने कोरेगावात खळबळ माजली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी, कोरेगाव शहरातील अनन्या रेसिडेन्सीमधील तिसर्या मजल्यावर दोघा मित्रांनी आत्महत्या केली आहे. यातील एकाने स्वत:ला पेटवून घेतले, तर दुसर्याने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. माहिती मिळताच कोरेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आत्महत्त्येचे कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे.