maharashtra

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा


अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 25 रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सातारा शहर परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून, तिला जबरदस्तीने गाडीवर बसवून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी अक्षय गणेश सूर्यवंशी रा. बुधवार पेठ, सातारा याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक के. आर. गुरव करीत आहेत.