जुनी भांडणे मिटवून परत येत असताना सैदापूर, ता. सातारा येथे एकाला मारहाण केल्याप्रकरणी चार जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : जुनी भांडणे मिटवून परत येत असताना सैदापूर, ता. सातारा येथे एकाला मारहाण केल्याप्रकरणी चार जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २६ रोजी ५.३० वाजण्याच्या सुमारास यशवंत दीपक माने, वय २१, रा. चाहुर, खेड तालुका सातारा हा मित्रांसमवेत जुनी भांडणे मिटवण्याकरता तामजाई नगर येथे गेला होता. भांडणे मिटवून परत येत असताना सैदापूर येथे श्रेयस भोसले श्रेयस देशमुख साहिल भोसले अमर पवार या चौघांनी त्याला लाकडी दांडक्याने मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.