maharashtra

सातारा जिल्ह्यामधील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या ई-सर्व्हिस शीट पोर्टलचे अनावरण


पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या अभिनव उपक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यामधील सर्व पोलीस अधिकारी व सर्व पोलीस अंमलदार तसेच लिपीक व शिपाई यांचे सेवापट ई-सर्व्हिस शीट पोर्टलच्या माध्यमातुन संगणक अगर मोबाईलवर पाहता येणार आहे.

सातारा : पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या अभिनव उपक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यामधील सर्व पोलीस अधिकारी व सर्व पोलीस अंमलदार तसेच लिपीक व शिपाई यांचे सेवापट ई-सर्व्हिस शीट पोर्टलच्या माध्यमातुन संगणक अगर मोबाईलवर पाहता येणार आहे. याचे अनावरण दिनांक 31 रोजी पोलीस मुख्यालय सातारा येथे पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते झाले.
या उद्घाटनाच्या वेळी अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल, पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील प्रभारी पोलीस उपअधीक्षक (गृह) सातारा तसेच पोलीस मुख्यालय व शाखेमधील पोलीस अंमलदार हजर होते. तसेच उद्घाटनास ऑनलाईन व्ही. सी. द्वारे सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व अंमलदार हजर होते. पोलीस उपनिरीक्षक शेखर कडव, वाचक अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले.
पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी ई-ऑफिस पोर्टलची आवश्यकता व त्याचे महत्व स्पष्ट करत जास्तीत जास्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी याचा वापर करावा, असे आवाहन केले.
अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. आँचल दलाल यांनी या ई-ऑफिस पोर्टलची प्रस्तावणा केली. तदनंतर पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी ई-ऑफिस पोर्टलचे अनावरण केले. ई-ऑफिस पोर्टलमध्ये 70% पोलीस अंमलदार यांचा डेटा अद्यावत करण्यात आला असून उर्वरित डेटा अद्यावत करण्याचे कामकाज सुरु आहे. ई-ऑफिस पोर्टल हे ड्रिमकेअर डेव्हलपर्स प्रा.लि. पुणे यांनी तयार केले असुन त्यांचे संचालक म्हणुन विवेक मॅगजी व त्यांची टिम काम पाहत असुन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील प्रभारी पोलीस उपअधीक्षक (गृह) यांनी उपस्थित सर्वाचे आभार मानले व सांगता केली.
या नुतन अभिनव उपक्रमांतर्गत सातारा जिल्हयामधील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना त्यांचे युजरनेम व पासवर्ड वापरुन लॉगीन करता येईल, तसेच यामध्ये दोन प्रकारचे सिक्युरीटी देण्यात आल्या असुन जसेकी प्रथम लॉगीन केले असता पासवर्ड बदलणे व प्रत्येक लॉगीनचे वेळी ओ.टी.पी. टाकणे अनिवार्य करण्यात आलेले आहे.
या ई-सर्व्हिस पोर्टलमध्ये सेवापुस्तकाचे पहिले पान, बक्षीसाचे शेवटचे पान, शिक्षेचे शेवटचे पान, रजेचे शेवटचे पान व इंक्रिमेंटचे शेवटचे पान यांची माहिती पीडीएफ स्वरुपात देण्यात आलेली आहे. तसेच एम.एस.सी.आय.टी. नॉमीनेशन, अवगत भाषा याबाबतची माहिती यामध्ये हो- नाही अशा पद्धतीने अद्यावत करण्यात आलेली आहे. तसेच मागील 10 वर्षांतील सव्हिसशीट रिमार्क (B. B+ A, A+ अशा स्वरुपात) पाहता येणार आहेत. तसेच वरील माहितीमध्ये काही दुरुस्ती अगर बदल करावयाचा असल्यास त्रुटी नावाचा टॅब देण्यात आलेला आहे. सदर टॅबमध्ये आपण आपल्याला आवश्यक दुरुस्तीबाबतच्या सुचना देता येतील.