नागठाणे गावच्या हद्दीत बोरगाव पोलिसांचा चक्री जुगार अड्डयावर छापा
७१ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
नागठाणे, ता. सातारा गावच्या हद्दीत बोरगाव पोलिसांनी चक्री जुगार अड्डयावर छापा टाकून ७१ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत हस्तगत केला. त्यामध्ये रोख रक्कम, मोबाइल, दुचाकी, कॉम्प्यूटर, माऊस, राऊटर, सीपीयु असा समावेश आहे.
सातारा : नागठाणे, ता. सातारा गावच्या हद्दीत बोरगाव पोलिसांनी चक्री जुगार अड्डयावर छापा टाकून ७१ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत हस्तगत केला. त्यामध्ये रोख रक्कम, मोबाइल, दुचाकी, कॉम्प्यूटर, माऊस, राऊटर, सीपीयु असा समावेश आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २४ रोजी बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांना गोपनीय माहिती मिळाली, नागठाणे गावच्या हद्दीत कराड ते सातारा जाणाऱ्या सर्व्हिस मार्गावरील चौंडेश्वरी पान स्टॉल च्या पाठीमागे पत्र्याच्या टपरीमध्ये काही इसम चक्री जुगार आकड्यावर लोकांकडून पैसे स्वीकारून जुगार अड्डा चालवत आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारावर त्यांनी महिला पोलीस उपनिरीक्षक वर्षाच्या डाळिंबकर, पोलीस कर्मचारी प्रवीण शिंदे, राजू शिखरे, विशाल जाधव, उत्तम गायकवाड, सत्यम थोरात यांना जुगार अड्डयावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला असता त्या ठिकाणी एक इसम चक्री जुगार चालवीत असल्याचा आढळून आला. त्याच्याकडून रोख रक्कम, मोबाइल, दुचाकी, कॉम्प्यूटर, माऊस, राउटर, सीपीयु असा एकूण ७१ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.