पुसेगांव पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात कायद्याचे वाजले बारा आणि पोलिस अधिकारी म्हणतात माझी तुंबडी भरा?
खटाव तालुक्याला दोन आमदार, दोन खासदार; मात्र पोलिस प्रशासनावर वचक ठेवण्यात अपयशी
कित्येक वर्षे या पुसेगांव पोलिस स्टेशनला दयानंद ढोमे, नंदकुमार पिंजण, विश्वजीत घोडके सारखे कर्तव्य कठोर व क्रियाशील पोलीस निरिक्षक भेटलेला नाहीत, त्यामुळे गेली 10/15 वर्षे व त्यानंतर आलेले (अपवाद वगळता) सर्व कारभारी फक्त पाट्या टाकणारे, निष्क्रिय, बेजबाबदार आणि वरकमाईकडे कल असणारेच अज्ञानी सहाय्यक पोलीस निरिक्षक होवून गेले.
प्रकाश राजेघाटगे
पुसेगाव : उत्तर खटाव तालुक्यातील पुसेगांव हे एक महत्वपूर्ण व्यापारी पेठेचे तसेच तीर्थक्षेत्र म्हणून सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे गांव आहे. या गांवात शासकीय तसेच महसुलीची सर्व कार्यालये आहेत. त्यात प्रमुख पुसेगांव पोलिस स्टेशन येते, परंतु गेली कित्येक वर्षे या पुसेगांव पोलिस स्टेशनला दयानंद ढोमे, नंदकुमार पिंजण, विश्वजीत घोडके सारखे कर्तव्य कठोर व क्रियाशील पोलीस निरिक्षक भेटलेला नाहीत, त्यामुळे गेली 10/15 वर्षे व त्यानंतर आलेले (अपवाद वगळता) सर्व कारभारी फक्त पाट्या टाकणारे, निष्क्रिय, बेजबाबदार आणि वरकमाईकडे कल असणारेच अज्ञानी सहाय्यक पोलीस निरिक्षक होवून गेले.
पुसेगांव पोलिस स्टेशनला कार्यक्षेत्र मोठे
पुसेगांव येथून 50-60गावांचा कारभार चालतो. त्यामुळे येथे अवैध धंद्यांचा सुळसुळाट फार. दोन नंबरचे धंदे करणारे यात दारू-गांजा -गौण खनिज-भिशी- डबल-टिबल पैसे करणारे स्किम लावणारे -आर्थिक फसवणुक करणारे 1/2/3 कोटीची फसवणुक करणारे भुसार, शेतीमाल व्यापारी असे मोठे बेकायदेशीर जाळे या भागात पसरलेले आहे. अशा प्रकरणावर न्याय मागण्यासाठी सामान्य माणूस पोलिस स्टेशनला जायला भितो. कारण वेगवेगळ्या बेकायदेशीर व्यापार व व्यवसायात गुंतलेल्यांची उठबस नेहमीच अशा रक्षकांच्या दारी असते ! कारण असे दलाल हे अर्थपुर्ण संबंधातून ती ती सरकारी कार्यालये चालवत असतात. त्यांमधून मंथली मिळणारी भलीमोठी रक्कम ही नेहमीच लोकांना न्यायापासून लांब ठेवण्यासाठी काम करते. मंग हीच बेकायदेशीर कामे करणारी कार्यालये जनतेला काय न्याय देणार ? पण याच अवैध रक्कमेचा शोध जर त्रयस्थ यंत्रणेद्वारे प्रशासनाने घेतला तर शासनाचे डोंळे पांढरे होतील. कारण ज्या व्यक्तीला न्याय हवा त्याला कधीच अशा पोलिस स्टेशन मध्ये वर्षोनी वर्षे न्याय मिळाला नाही, आणि नेहमी अन्यायच पदरी पडतो असे हे बिनकामी आणि भ्रष्ट पोलिस स्टेशन कुणाच्या कामाचे?
पांढरपेशी गुन्हेगारीच्या मुसक्या कोण आवळणार?
गेली अनेक वर्षे रेकाॕर्डवरचे आणि रेकाॕर्डवर नसलेले पांढरपेशी गुन्हेगांरांनी खटाव उत्तर तालुक्यात धुमाकुळ घातला आहे. यात काही परप्रांतीय व्हाईट गुन्हेगार ज्याचे पोलिसी रेकाॕर्ड नाही असे बरेच या भागात महाभाग आहेत. जे जनतेला ठगवतात, लुटतात. जे परप्रांतिय येथे स्थायिक झालेत किंवा काही जण बाहेरच्या जिल्ह्यातून येवून स्थायिक झालेत ते जोमानं फसवणुकीची /गंडा घालण्याचा उद्योग करतात. अशा लोकांनी या भागात स्थावर मालमत्ता देखील केली आहे. मागील महिन्यात तालुक्यातील खटाव परिसरात येरळा नदी पात्रात सातारा गुन्हे अन्वेषण विभागाने रात्रीची रेड करुन 26 लाखांच्या वाळूसह मुद्देमाल जप्त केला. पण पुसेगाव पोलिस स्टेशन फक्त महिना मंथलीच गोळा करुन बेकायदेशीर कामाला बळ देत होते. हे स्वतःची तुंबडी भरण्यासाठीच का?
खटाव उत्तर तालुक्यात अनेक गांवात दारूबंदी असताना ती याच पोलिस स्टेशनच्या आशीर्वादाने जोमात चालू आहे. अशा ठिकाणी दारूबंदी - उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिस प्रशासन दोघेही मुग गिळून का आहेत? तर काही ठिकाणी हरबल तंबाखू (गांजा वगैरे अंमली पदार्थ किंवा काय) मिळतात या भागात. पण हे हफ्त्यात दडलेल्या रक्कमेमुळे अशा वस्तु कधीच सापडत नाहीत आणि अशा व्यवसायातील आरोपीही. हे एक आश्चर्यजनक आहे!
महाराष्ट्रात गुटखाबंदी असताना या पोलिस स्टेशन च्या कार्यक्षेत्रात येवून अन्नभेसळ विभागाने मोठी कारवाई केली होती. पण या पोलिस स्टेशनला मात्र ते गुटखेवाले माहितच नव्हते की अर्थपुर्ण दुर्लक्ष करायचे होते?
डिसेबर महिन्यात उत्तर प्रदेश मधील कामानिमित्त येथे रहाणारा बांधकाम मजुर त्याला मारहाण करुन गायब केलाय. त्याचा तपास जैसे थे ठेवला जातो असे का? यात आरोपीची नावे, बिहार राज्यातील त्यांचे गाव, तालुका, जिल्हा, मोबाईल नंबर सर्व रेडिमेड माहिती देवून देखिल गायब झालेल्या व्यक्तिच्या नातेवाईकाला तुम्हीच तपास करुन बघा अशी उध्दट उत्तरे हे प्रशासन कसे देऊ शकते ? तो गायब व्यक्ती कोठे सापडतोय का ते नीट तपासा ? अशी उलट भाषा वापरी जात आहे! आणि उपरती म्हणजे आम्हाला कळलं तर सांगतो, तुम्हाला ही कुठली संवैधानिक भाषा? काही अल्पवयीन मुली -महिला यांना फुस लावून पळवणे किंवा फसवणे या घटनांचा तर तपासच लागणे पुसेगांव पोलीस स्टेशनला अवघड होत आहे की काय?
या भागातील अनेक गरिब शेतकरी यांचे आले-कांदा-बटाटा -बटाटा बियाने, सोयाबिन, घेवडा, हरभरा, ज्वारी, गहु वगैरे भुसार-मालाचे बोगस आणि विनापरवाना व्यापार करणारे व्यापारी लाखो-करोडो रुपयांना या भागातील शेतकरीना गंडवत आहेत अथवा फसवले आहे. वरुन दमदाटी -शिवीगाळ जिवे मारण्याची धमकी शेतकऱ्यांना नित्याचीच झाली आहे. तसेच जिवनावश्यक वस्तुची (डाळ-तेल-साखर कडधान्य वगैरे) ठोक आणि भुसार - माल व्यापारी जनतेला चढ्या भावाने विकून प्रचंड साठेबाजी करुन बेकायदेशीर व्यापार करतात. त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन देखिल भ्रष्ट पोलिस प्रशासनामुळे अशा व्यापाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई या पोलिस स्टेशन कडून होत नाही!
असे गुन्हेगार ऊजळ माथेने पोलिसांच्या अर्थपुर्ण संबंधातून मोकाट फिरतात व पुन्हा नवीन व्यक्तिला गंडा घालण्याच्या तयारीत असतात! अनेक शेतकरीनी अशा व्यापारीच्या विरुद्ध फिर्यादी दिल्या तर काही शेतकरी कोर्टात दाद मागणी साठी गेले पण कधी तपास अशा फसवणुकीच्या गुन्हेचा झालाच नाही की व्यापारीला अटक करुन कोर्टात हजर केलेचे ऐकण्यात नाही !म्हणून तर पुसेगांव पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात जनता भयभीत आहे तर गुन्हेगार मोकाट आहेत.
दाखल फिर्यादीत देखिल कधी कुठल्या आरोपीला शिक्षा झाल्याचे ऐकिवात आले नाही. एवढी सक्षम तपासी कार्यपद्धती पुसेगांव पोलिस स्टेशनची आहे का ? काही महिला गुन्हेगार देखील या पुसेगाव पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात लोकांना आर्थिक गंडा घालण्याच्या व्यवसायात कार्यरत आहेत. त्यांच्यावर एक/दोन फिर्यादी देखिल झालेल्या आहेत. पण त्याच्यावर योग्य तपास करुन फसवणुकीचे गुन्हे दाखल या प्रशासनाला करता आले नाहीत. तसेच सेवागिरी महाराज यात्रेनिमित्त काही गरिब लहान-मोठे फिरस्थे व्यवसायिक पुसेगांव येथे आले असता त्यांना देखील शिवीगाळ आणि मारहाण करुन या पोलिस स्टेशनकडून पैसे उकळले गेले आहेत. येथे व्यवसाय करायचा असेल तर मला पैसे दे, म्हणून. नाहीतर कोरोनाच्या केसेस करून तुझे सामान जप्त करु, अशी भिती दाखवली गेली. पैसे ऊकळण्यासाठी म्हणून तर पुसेगांव यात्रेतील काही व्यापारी व गरीब दुकानदारांनी भितीपोटी अशी रक्कम हप्तापोटी दिली भ्रष्ट पोलीस स्टेशनला. अशाने कायदा सुव्यवस्था भ्रष्ट झाली आहे हे मात्र नक्की! काही ठिकाणी कोरोनाच्या नावाखाली लहान मोठे दुकानदार -टुव्हिलर्स धारक यांना रोडवरच, तर काहीवेळी भाजीमंडईत जीवघेणी मारहाण करणारे पोलिस स्टेशन यांचेवर कारवाई कधी झालीच नाही. यांना नागरिकांना मारहाण करण्याचे अधिकार दिले कोणी ? कारण या पोलीस कर्मचाऱ्यांच्या भितीपोटी सामान्य लोक फिर्यादसुद्धा देत नाहीत! तर काही फिर्यादीमध्ये आरोपी किंवा फिर्याददार यांच्याकडून कायद्याच्या अज्ञानापोटी जो मलिदा लाटला जातो भ्रष्ट कर्मचारीचेकडून, यात तर जनता भरडलीच जाते आर्थिकदृष्ट्या! अशा एक ना अनेक घटनांमध्ये अडकलेल्या पुसेगांव पोलिस स्टेशनवर जिल्ह्याचे गृहराज्यमंत्री असलेले शंभूराजे देसाई कारवाई करणार का ? अशी विचारणा पुसेगांव राष्ट्रवादीचे शहरप्रमुख राम जाधव यांनी या प्रत्रकाद्वारे केली आहे.