येथील औद्योगिक वसाहत परिसरात असणाऱ्या दत्तनगर येथे एकाला मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : येथील औद्योगिक वसाहत परिसरात असणाऱ्या दत्तनगर येथे एकाला मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १५ फेब्रुवारी रोजी ७.१५ ते ७.३० वाजण्याच्या सुमारास सातारा येथील औद्योगिक वसाहत परिसरात असणाऱ्या दत्तनगर येथील कॅनॉलनजीक पितांबर शिंदे, बयामत शिंदे, फैजा शिंदे आणि बिनाबाई शिंदे यांनी मेरानाम राजू शिंदे याला संगणमत करून काठी व लोखंडी पाइपने मारहाण केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.