मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात वाहनचालकावर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात वाहनचालकावर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 29 डिसेंबर रोजी एक वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर नागठाणे, तालुका सातारा गावच्या हद्दीत संतोष पोपटराव रणसिंग वय 45, राहणार बोरगाव, तालुका सातारा हे कामावरून पायी चालत घरी येत असताना महामार्ग ओलांडत असताना त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. धडकेनंतर संबंधित वाहनचालक हा वाहन घेऊन पसार झाला. या धडकेत संतोष रणसिंग यांचा मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात मंगेश दिलीप तांबोळी राहणार बोरगाव, तालुका सातारा यांनी नोंदवली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मछले करीत आहेत.