maharashtra

निरीक्षण गृहातून दोन मुलांचे अपहरण


येथील निरीक्षण गृहातून १६ आणि १३ वर्षांच्या दोन मुलांचे अपहरण करण्यात आले असून, ही घटना दि. १९ सकाळच्या सुमारास समोर आली. याबाबत निरीक्षण गृहातील कर्मचारी प्रवीण संभाजी साबळे वय ५४, रा. शिवथर, ता, सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सातारा : येथील निरीक्षण गृहातून १६ आणि १३ वर्षांच्या दोन मुलांचे अपहरण करण्यात आले असून, ही घटना दि. १९ सकाळच्या सुमारास समोर आली. याबाबत निरीक्षण गृहातील कर्मचारी प्रवीण संभाजी साबळे वय ५४, रा. शिवथर, ता, सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून १६ आणि १३ वर्षांची दोन विधीसंघर्ष बालक निरीक्षण गृहात होती. काल, सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास संबंधित दोन्ही मुले निरीक्षण गृहात नसल्याचे तेथील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी परिसरात शोधाशोध घेतली. परंतु ती मुले कोठेही सापडली नाहीत. त्यानंतर साबळे यांनी दोन्ही मुलांचे अज्ञाताने फूस लावून अपहरण केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी तातडीने तपासाला सुरूवात केली असून, ही मुले त्यांच्या घरी गेली आहेत का, हे पाहण्यासाठी पोलिसांची एक टीम रवाना झाली आहे.