महिलेवर अत्याचार करून तिला धमकी दिल्या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : महिलेवर अत्याचार करून तिला धमकी दिल्या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 23 जुलै रोजी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हॉटेलमध्ये काम करणाऱ्या महिलेवर नामदेव मदने राहणार तोडले तालुका माण याने अत्याचार करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका वेटरलाही मारहाण करून शिवीगाळ केली. याप्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात मदने याच्यावर अत्याचारासह ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास दहिवडीचे पोलीस उपविभागीय अधिकारी निलेश देशमुख करीत आहेत.