आमदार शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार दिनांक 19 रोजी सायंकाळी 5 वाजता आंबवडे चौक, ता. कोरेगाव येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी मेळावा तथा स्वाभिमान सभा होणार आहे. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
सातारा : आमदार शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार दिनांक 19 रोजी सायंकाळी 5 वाजता आंबवडे चौक, ता. कोरेगाव येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी मेळावा तथा स्वाभिमान सभा होणार आहे. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
सभेपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांचे वाढे फाटा येथे कार्यकर्त्यांच्या वतीने जंगी स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर तेथून कार्यकर्त्यांची रॅली निघणार असून या रॅली समवेत खासदार सुप्रिया सुळे व आमदार शशिकांत शिंदे हे वाढे- आरळे वडूथ शिवथर मार्गे अंबवडे चौक येथे येणार आहेत. यावेळी आमदार बाळासाहेब पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, सत्यजितसिंह पाटणकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष संजना जगदाळे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते या स्वाभिमान सभेला उपस्थित राहणार आहेत.
एक दिवस निष्ठेसाठी, एक दिवस साहेबांसाठी, एक दिवस स्वाभिमानासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी आणि स्वाभिमानाचा जागर करण्यासाठी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शशिकांत शिंदे मित्र समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.