दोघांना मारहाण केल्याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : दोघांना मारहाण केल्याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 24 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घराच्या पाठीमागील पाट का मुजवला, असे विचारल्याचा राग मनात धरून देवेंद्र राजेंद्र जाधव व त्यांची पत्नी अर्चना देवेंद्र जाधव राहणार उडतारे, तालुका वाई यांना जितेंद्र बापू जाधव, तेजस जितेंद्र जाधव, विवेक जितेंद्र जाधव सर्व राहणार उडतारे, तालुका वाई यांनी हॉकी स्टिकने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याबाबत भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस हवालदार भोसले अधिक तपास करीत आहेत.