अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 15 नोव्हेंबर रोजी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास वाई येथील साठे मंगल कार्यालय, मधली आळी येथे आडोशाला प्रीतम सुनील शिंदे वय 26, राहणार गंगापुरी, वाई हा अस्तित्व लपवून चोरी करण्याच्या हेतूने लपून बसलेल्या स्थितीत मिळून आला. याप्रकरणी त्याच्यावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस नाईक यादव अधिक तपास करीत आहेत.