अज्ञाताने अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सातारा : अज्ञाताने अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 4 फेब्रुवारी रोजी दोन वाजण्याच्या सुमारास नंदलाल मनालाल बावरी रा. बॉम्बे रेस्टॉरंट पुलाखाली, सातारा यांचा धाकटा भाऊ गणपत मनालाल बावरी या अल्पवयीन मुलास अज्ञाताने पळवून नेले असल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.