maharashtra

महामार्गावर कारवाईत 25 लाखांचा गुटख्यासह दोघे ताब्यात

सागर भोगावकर यांच्या सर्तकतेमुळे झाली मोठी कारवाई

कारला कट मारणे पडले महागात, गुटख्याची झाली पोलखोल.. सातार्‍यातील सामाजिक कार्यकर्ते सरदार उर्फ सागर भोगावकर तसेच त्यांच्या सोबत मारूती जानकर ,निवृत्ती शिंदे व रतन पाटील हे हुंदाई कारने सातार्‍याला येत होते. त्याच वेळी या घटनेतील टेंपो चालकाने त्यांच्या कारला कट मारला. पुढे भोगावकरांनी गाडी अडवुन चालकाला विचारणा केली. त्याच दरम्यान त्यांना टेंपोतील मालाबाबत संशय आला. याची विचारणाही त्यांनी चालकास केली. त्यावेळी त्याने गुटखा असल्याचे सांगितले . त्यांनी तात्काळ जागरूकता दाखवुन एस. पी. समीर शेख यांना कळविल्यानेच एवढया मोठ्या प्रमाणात गुटखा वाहतुक उघडकीस आली.

 पुणे -बंगळुरू महामार्गावरून महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेल्या हिरा पानमसाला व गुटख्याची वाहतुक करणारे वाहन ताब्यात घेऊन त्यातील गुटखा व वाहन असे एकूण 25 लाख रूपयेचा मुद्देमाल बोरगाव पोलीसांनी ताब्यात घेतला आहे. तर दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाचे सागर भोगावकर यांनी माहिती दिल्याने ही कारवाई करण्यात पोलिसांना यश आले.
बोरगाव पोलीस ठाणे व प्रत्यक्ष घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार दि. 30 रोजी रात्री नऊ ते दहा वाजणेचे सुमारास कराड ते सातारा लेनवरून अतीत (ता. सातारा) गावचे हद्दीत माजगाव फाटा परिसरात एक अशोक लेलँड कंपनीचा बडादोस्त मॉडेलचा टेंपो क्र ( एम. एच 09जी. टी. 1355) सातारच्या दिशेने निघाला होता. त्याच वेळी सातारा जिल्ह्यातील काही आम आदमी पार्टीचे पदाधिकारी सागर भोगावकर यांच्यासह त्यांच्या कारमधून (क्र एम. एच. 11 बी. एच. 9296) सातार्‍याकडेच निघाले होते.
यावेळी त्यांच्या कारला टेंपोने कट मारल्याने अपघात झाला असता. या प्रकारामुळे भोगावकर यांनी टेंपोचा पाठलाग करत माजगाव फाटा परिसरात असणार्‍या एका पेढयाच्या मोठ्या दुकानासमोर कट मारणारा टेंपो अडवला व चालकास विचारणा केली. त्यावेळी त्यांना टेंपोमध्ये गुटखा असल्याचा संशय आला. त्यांनी तात्काळ याबाबत थेट पोलीस अधिक्षक समीर शेख यांना याबाबत कल्पना दिली.
समीर शेख यांनी मिळाल्या माहिती वरून बोरगाव पोलीस ठाण्यास कारवाईचे आदेश दिले. मिळालेल्या आदेशावरून बोरगाव पोलीस ठाण्याच्या डी. बी टीम मधील अंमलदार हवालदार दादा स्वामी, अमोल सपकाळ,पो. नाईक प्रशांत चव्हाण, दीपक मांडवे, कॉन्स्टेबल केतन जाधव चालक उत्तम कदम यांनी माजगाव फाटा येथे जाऊन सदरचा टेंपो ताब्यात घेतला. रविवारी (दि. 31) रोजी या बाबतची माहिती अन्न व औषध प्रशासनाच कळविली. त्यावेळी अधिकारी कर्मचार्‍यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात येऊन ताब्यात घेतलेल्या मालाची पडताळणी केली. त्यावरून तो महाराष्द्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा व पान मसाला असल्याचे निष्पन्न झाले. अन्न व औषध प्रशासनाच्या वंदना रूपनवर यांनी या घटनेची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात दिल्यानंतर गुटखा व वाहतुक करणारे वाहन असा एकुण 25 लाखांचा मुद्देमाल बोरगाव पोलीसांनी ताब्यात घेतला असुन बाबासो बंडा मडके व दिपक कल्लापा अबदान यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास बोरगाव पोलीस करत आहेत.