सातारा जिल्ह्यामधील दुष्काळी भाग म्हणून ओळख असणार्या माण तालुक्यातील म्हसवड नजीक खडकी परिसरात तब्बल एक कोटीहून अधिक किमतीच्या 422 किलो वजनाची गांजाची झाडे हस्तगत करण्यात म्हसवड पोलीस व सातारा स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
सातारा : सातारा जिल्ह्यामधील दुष्काळी भाग म्हणून ओळख असणार्या माण तालुक्यातील म्हसवड नजीक खडकी परिसरात तब्बल एक कोटीहून अधिक किमतीच्या 422 किलो वजनाची गांजाची झाडे हस्तगत करण्यात म्हसवड पोलीस व सातारा स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
या प्रकरणी कुंडलिक खांडेकर यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, खडकी परिसरात मका व डाळिंब बागेत गांजाची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानूसार सोमवार दि. 13 रोजी मध्यरात्री उशिरा पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी एकास ताब्यात घेतले.
या आधी काही दिवसांपुर्वीच सातारा जिल्ह्यातील म्हसवड शहरापासुन सुमारे दहा किलेमीटर अंतरावरील पानवण गावातील ऊसाच्या शेतात दडवून ठेवलेला तब्बल 15 लाख रुपये किंमतीचा गांजा पोलिसांनी धाड टाकून जप्त केला होता.
ताब्यात घेण्यात आलेला कुंडलीक खांडेकर गेल्या तीन- चार वर्षापासून थोड्या फार प्रमाणात शेतातच गांजाची लागवड करीत होता. त्यातून त्याला चांगला आर्थिक लाभ आत्तापर्यंत मिळाला होता. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड त्याने केली असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.