फलटण शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलने आपल्या वाढदिवसादिवशीच राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्टच असून या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ माजली आहे.
फलटण : फलटण शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलने आपल्या वाढदिवसादिवशीच राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्टच असून या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ माजली आहे.
अच्युत साहेबराव जगताप वय ३१, रा. एनकुळ, ता. खटाव असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नांव आहे. फलटण शहर पोलीस ठाण्यात गेली पाच वर्षापासुन पोलिस हवालदार पदावर ते कार्यरत होते.
आज दि. २ आक्टोबर रोजी त्यांचा वाढदिवस होता. सांयकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास पोलीस वसाहतीमधील आपल्या राहत्या घरात जगताप यांनी आत्महत्या केली. मात्र आत्महत्येचे कारण अद्यापही समजले नाही. अधिक तपास फलटण शहर पोलीस करीत आहेत.