maharashtra

शाहूपुरी पोलिसांचा जुना मोटर स्टँड परिसरातील जुगार अड्ड्यावर छापा


2 लाख 10 हजार 620 रुपयांचा मुद्देमाल जप्त; सात आरोपी ताब्यात
जुना मोटर स्टँड परिसरात चोरगे चव्हाण अपार्टमेंटच्या गाळ्यात अवैध फन गेम चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर शाहूपुरी पोलिसांनी छापा मारून सात जणांना ताब्यात घेतले. या कारवाईमध्ये प्रिंटर रोख रक्कम, संगणक, इतर साहित्य असा 2 लाख 10 हजार 620 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सातारा : जुना मोटर स्टँड परिसरात चोरगे चव्हाण अपार्टमेंटच्या गाळ्यात अवैध फन गेम चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर शाहूपुरी पोलिसांनी छापा मारून सात जणांना ताब्यात घेतले. या कारवाईमध्ये प्रिंटर रोख रक्कम, संगणक, इतर साहित्य असा 2 लाख 10 हजार 620 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अमीर सलीम शेख वय 20 राहणार वनवासवाडी तालुका जिल्हा सातारा, सतीश शामराव कुऱ्हाडे वय 22 रा. नामदेव वाडी झोपडपट्टी, सागर अशोक गायकवाड वय 21 रा. आदर्श सोसायटी मोळाचा ओढा, करण दशरथ घाडगे रा. अंबवडे खुर्द तालुका सातारा, शंकर पांडुरंग चिकणे वय 41 राहणार चिकणेवाडी तालुका सातारा, विलास साईबु पवार वय 23 राहणार नामदेव वाडी झोपडपट्टी, गाळामालक दिलीप म्हेत्रे राहणार सातारा अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
या प्रकरणाची पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, जुना मोटर स्टॅन्ड येथे फन गेम अवैध जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बशीर मुल्ला यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली होती. शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अपार्टमेंटच्या गाळ्यात दुपारी साडेबारा वाजता छापा मारला. त्याठिकाणी काही इसम भिंतीवरील टीव्ही स्क्रीनवर फिरणाऱ्या आकड्यांवर पैसे लावून जुगार खेळत असल्याचे आढळून आले. या संदर्भात पोलिसांनी फन गेम चालवणाऱ्या इसमासह सातजणांना ताब्यात घेतले. या कारवाईत संगणक, प्रिंटर, रोख रक्कम, जुगाराचे साहित्य असे दोन लाख दहा हजार सातशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गाळ्या बाबत पोलिसांनी चौकशी केली असता गाळामालकाने अवैध जुगार चालवण्यासाठी गाळा उपलब्ध करून देण्याची माहिती प्राप्त झाली. त्यामुळे गाळामालक याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस नाईक स्वप्नील कुंभार यांनी अवैध जुगार चालवणाऱ्या व खेळणाऱ्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक ओंकार यादव करत आहेत. अशा प्रकारे कोणी अवैध व्यवसायासाठी गाळा दुकान जागा उपलब्ध करून दिल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. या कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे, पोलीस उपनिरीक्षक बशीर मुल्ला, हेड कॉन्स्टेबल हसन तडवी, निलेश फडतरे, अमित माने, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, स्वप्निल सावंत, सचिन पवार यांनी सहभाग घेतला.