चार मुले तरी नोकरी हवी
पहिल्या पत्नीस सोडचिठ्ठी न देता दुसरा विवाह सातारा जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण यांचा कारनामा
सातारा जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण यांनी स्वतः ची 4 अपत्ये असताना त्यांची माहिती शासनाकडे लपवून ठेवेल्याची तक्रार सामजिक कार्यकर्ते तसेच युवा राज्य फौडेशनचे संस्थापक अध्यक्ष महारुद्र तिकुंडे यांनी आरोग्य सेवा उपसंचालक यांच्याकडे केली आहे.
सातारा जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण यांनी स्वतः ची 4 अपत्ये असताना त्यांची माहिती शासनाकडे लपवून ठेवेल्याची तक्रार सामजिक कार्यकर्ते तसेच युवा राज्य फौडेशनचे संस्थापक अध्यक्ष महारुद्र तिकुंडे यांनी आरोग्य सेवा उपसंचालक यांच्याकडे केली आहे.
भारताच्या संविधानातील अनुच्छेद 309च्या परंतुकाव्दारे आलेल्या अधिकाराचा वापर करुन महाराष्ट्राचे राज्यपाल याव्दारे शासकीय सवेतील अ, ब, क, ड मधील पदाच्या सेवा प्रवेशासाठी एक आवश्यक अर्हता म्हणून लहान कुटंबाचे प्रतिज्ञापत्र देण्याची तरतूद केली आहे. यामध्ये पती, पत्नी व 2 मुले असे जास्तीत जास्त 4 जणांचे कुटुंब असणे अनिवार्य असताना सातारा जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण यांना पहिली पत्नी पासून 2 मुले व दुसर्या पत्नी पासून 2 असे एकूण 4 मुले आहेत त्यामधील एक अपत्य 2006 नंतरचे असल्याने 28 मार्च 2005 च्या अधिसुचनेची पायमल्ली सातारा जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण यांनी केली असून सदरची माहिती जाणीवपूर्वक शासनास / प्रशासनास न देता लपवलेली आहे.
सातारा जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण यांनी सदरची माहिती लपवून फौजदारी स्वरुपाचा गुन्हा केला आहे तसेच पहिल्या पत्नीस सोडचिठ्ठी न देता दुसरा विवाह थाटने हा गैरशिस्तीचा भाग असल्यामुळे सातारा जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण यांना बडतर्फ करुन सुभाष चव्हाण याची मे 2023 ला सेवा निवृत्ती होत असल्यामुळे निवृत्ती नंतरचे सर्व लाभ अदा करु नयेत अशी मागणी सामजिक कार्यकर्ते तसेच युवा राज्य फौडेशनचे संस्थापक अध्यक्ष महारुद्र तिकुंडे यांनी आरोग्य सेवा उपसंचालक यांच्याकडे केली आहे. सदरचे तक्रारी अर्जाचे प्रती मा. मुख्यमंत्री, मा. आरोग्य मंत्री, मा. प्रधान सचिव, मा. आयुक्त, आरोग्य सेवा महाराष्ट्र राज्य मा. संचालक, आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य तसेच जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे पाठविल्या आहेत.