maharashtra

जिल्ह्यातील दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण


Kidnapping of two minor girls in the district
जिल्ह्यातील दोन अल्पवयीन मुलींचे अज्ञात इसमांनी अपहरण केल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंद करण्यात आल्या आहेत.

सातारा : जिल्ह्यातील दोन अल्पवयीन मुलींचे अज्ञात इसमांनी अपहरण केल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंद करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 22 ते 24 जुलै दरम्यान गोखळी, तालुका फलटण येथील अल्पवयीन मुलगी तनुजा मारुती ढोबळे हिस कोणीतरी अज्ञाताने पळवून नेले असल्याची फिर्याद मुलीची आई सविता मारुती ढोबळे राहणार गोखळी, तालुका फलटण यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.
दुसर्‍या घटनेत दिनांक 23 जुलै रोजी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास सातारा येथील चिमणपुरा पेठेत राहणारे सुरेश धनाजी नारकर यांची अल्पवयीन मुलगी प्रतीक्षा सुरेश नारकर हिला कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार भोसले करीत आहेत.