मसूर, ता.कराड येथे मंगळवार दि. १ रोजी मध्यरात्री दरोडेखोरांनी डॉक्टर दाम्प्त्यास मारहाण करत दागिन्यांसह रोकड लंपास केली. जखमी डॉक्टर दाम्प्त्यावर कराडमधील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संपत वारे व अनिता वारे अशी त्यांची नावे आहेत.
कराड : मसूर, ता.कराड येथे मंगळवार दि. १ रोजी मध्यरात्री दरोडेखोरांनी डॉक्टर दाम्प्त्यास मारहाण करत दागिन्यांसह रोकड लंपास केली. जखमी डॉक्टर दाम्प्त्यावर कराडमधील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संपत वारे व अनिता वारे अशी त्यांची नावे आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी की, मध्यरात्री ८ ते ९ दरोडेखोर डॉ. वारे यांच्या घरात शिरले. डॉ. वारे यांच्यासह त्यांच्या पत्नी अनिता यांना जबर मारहाण केली. यानंतर यांच्या घरातील दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली. घटनास्थळी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, उंब्रजचे सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड यांनी पाहणी केली. याप्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संशयितांच्या शोधासाठी घटनास्थळी श्वान पथकास पाचारण करण्यात आले.