दुर्गा देवी विसर्जन मिरवणुकीत शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : दुर्गा देवी विसर्जन मिरवणुकीत शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 5 ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या निमित्ताने निघालेल्या दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत जय यमुण्णाप्पा शितीमणी वय 19, रा. भिमाबाई आंबेडकर झोपडपट्टी, सातारा याच्याकडे बेकायदा लोखंडी तलवार सापडली आहे. याबाबतचा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला असून पोलीस हवालदार जाधव अधिक तपास करीत आहेत.