maharashtra

अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा


अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी कारचालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी कारचालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक २५ ऑगस्ट रोजी सातारा-कोरेगाव रस्त्यावर, कच्छी स्टीलच्या दुकानासमोर संतोष विलास इंगळे वय 28, राहणार बोरगाव, तालुका कोरेगाव यांनी त्यांच्या ताब्यातील कार क्रमांक एम एच 50 538 ही बेदरकारपणे रस्त्याच्या पुढील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, चालवून राजेंद्र नानासाहेब देशमुख यांच्या दुचाकीस क्रमांक एम एच 11 बीएन  0547 समोरासमोर धडक देऊन मोटरसायकलचे नुकसान व देशमुख यांना गंभीर दुखापत झाल्याप्रकरणी सातार शहर पोलीस ठाण्यात भवानीदास रामचंद्र देशमुख वय 49, राहणार बोरखळ, तालुका सातारा यांनी तक्रार नोंदवली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार जे.बी. कारळे करीत आहेत.