शाहूपुरीतील रांगोळी कॉलनी येथे वाहनाची धडक विद्युत पोलला बसल्यानंतर झालेल्या दुर्घटनेत विद्युत वाहक असणारी तार तुटली व ती रस्त्यावर पडली. ही बाब रात्रगस्त जाणार्या पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती तात्काळ महावितरण विभागाला दिल्यानंतर त्यांनी दुरुस्ती केली.
सातारा : शाहूपुरीतील रांगोळी कॉलनी येथे वाहनाची धडक विद्युत पोलला बसल्यानंतर झालेल्या दुर्घटनेत विद्युत वाहक असणारी तार तुटली व ती रस्त्यावर पडली. ही बाब रात्रगस्त जाणार्या पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती तात्काळ महावितरण विभागाला दिल्यानंतर त्यांनी दुरुस्ती केली. दरम्यान, या घटनेमुळे मॉर्निंग वॉकसाठी जाणार्या नागरिकांची सुरक्षितता अबाधित राहिल्याने पोलिस व महावितरण विभागाचे कौतुक होत आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, गुरुवारी पहाटे पोलिस रात्रगस्तीची ड्युटी संपवून निघाले होते. रांगोळे कॉलनी येथे झाडपाल्यांची व विद्युत तारेंची पडझड झाल्याचे निदर्शनास आले. परिसरात पूर्णत: अंधार असल्याने वाहन, तसेच पहाटे येणार्या-जाणार्यांना धोका निर्माण होण्याची शक्यता होती. ही बाब ओळखून पोलिसांनी महावितरणशी संपर्क केल्यानंतर तानाजी कसबे यांनी तात्काळ घटनास्थळी जावून चालू विद्युत वाहिनी बंद करून प्राथमिक उपाययोजना केली. यावेळी मॉर्निंग वॉक करायला येणार्या नागरिकांना त्या परिसरात न जाण्याच्या सूचना करण्यात आल्या.