maharashtra

धनगर समाजाच्या आरक्षणाचा पहिला फटका बारामतीला : गोपीचंद पडळकर


धनगर व धनगड असा शब्दछल करत शरद पवारांनी धनगर आरक्षणाला विरोध केला. यामुळे धनगर समाजाच्या आरक्षणाचा पहिला फटका बारामतीला बसणार असल्याची टीका धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

सातारा : धनगर व धनगड असा शब्दछल करत शरद पवारांनी धनगर आरक्षणाला विरोध केला. यामुळे धनगर समाजाच्या आरक्षणाचा पहिला फटका बारामतीला बसणार असल्याची टीका धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
धनगर आरक्षणासाठीच्या 'धनगर जागर' यात्रेनिमित्त लोणंद (ता. खंडाळा) येथील जाहीर सभेत आमदार पडळकर बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ नेते आनंदराव शेळके-पाटील, माजी सभापती रमेश धायगुडे-पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.
आमदार पडळकर म्हणाले, धनगर समाजाला आरक्षण मिळाले, तर त्याचा पहिला फटका बारामतीला बसणार आहे. म्हणूनच शरद पवारांनी धनगर आरक्षणाला विरोध केला. धनगर समाजात ऊर्जा यावी, त्यांच्यातील भीती दूर व्हावी, यासाठी कशाचीही पर्वा न करता कोणालाही जाऊन भिडतो आहे. तरीही भीती जाणार नसेल तर साहेब, ताई, दादा, आबांचे खूळ डोक्यातून काढा. ही गुलाम बनवणारी यंत्रणा आहे. या पदांना प्रथम मूठमाती द्या, तरच तुम्हाला राजे होता येईल.
गट, तट, पक्ष विसरून धनगर समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यात सर्वांनी एकजुटीने सहभागी होण्याचे आवाहन पडळकर यांनी करत धनगर समाजाला आरक्षण मिळाले, तर त्याचा पहिला फटका बारामतीला बसणार आहे. म्हणूनच शरद पवारांनी धनगर आरक्षणाला विरोध केला. धनगर व धनगड असा शब्दछल करत खो घालण्याचे काम केले. आरेवाडी येथे (दि २२) होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले.