कुडाळ, ता. जावली गावच्या हद्दीत सुरू असणाऱ्या दारू अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी ३ हजार ३६० रुपयांच्या दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.
सातारा : कुडाळ, ता. जावली गावच्या हद्दीत सुरू असणाऱ्या दारू अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी ३ हजार ३६० रुपयांच्या दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कुडाळ गावच्या हद्दीत अंबोली धाब्याच्या पाठीमागे भिंतीच्या आडोशाला तेथीलच अतुल रमेश खटावकर हा दारू अड्डा चालवताना आढळून आला. त्याच्याकडून ३ हजार ३६० रुपयांच्या ४८ देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या.