कराड- ढेबेवाडी मार्गावर भरधाव पोलीस गाडीने चौघांना उडवले
अपघातात बारावीतील विद्यार्थी ठार; एकजण गंभीर
कराड- ढेबेवाडी मार्गावर भरधाव पोलीस गाडीने चौघांना उडवले. कुसूर (ता. कराड) गावच्या हद्दीत झालेल्या या अपघातात एकजण जागीच ठार झाला असून एकजण गंभीर, तर अन्य दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.
कराड : कराड- ढेबेवाडी मार्गावर भरधाव पोलीस गाडीने चौघांना उडवले. कुसूर (ता. कराड) गावच्या हद्दीत झालेल्या या अपघातात एकजण जागीच ठार झाला असून एकजण गंभीर, तर अन्य दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.
सुजल उत्तम कांबळे वय 17, रा. कोळेवाडी, ता. कराड असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कुसूर येथे रात्री उशिरा ढेबेवाडी पोलीस ठाण्याच्या गाडीने चौघांना उडवले. या गाडीवर शंकर खेतमर हा चालक होता. ढेबेवाडी पोलीस ठाण्याच्या दिशेला जाताना पोलीस गाडीने चौघांना उडवले. अपघातात एका दुचाकीचे आणि पोलीस गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
घटनास्थळी कराड तालुका पोलिसांनी धाव घेतली. तसेच जखमीवर कराडच्या कृष्णा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. चालक शंकर खेतमर दारू पिऊन गाडी चालवत असल्याचा नातेवाईकांनी आरोप केला आहे. पहाटे पर्यंत कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मृत सुजल कांबळे हा बारावीचा विद्यार्थी होता.