maharashtra

बाल निरीक्षण गृहातून अल्पवयीन मुलाचे अपहरण


बाल निरीक्षण गृहातून एका अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सातारा : बाल निरीक्षण गृहातून एका अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 31 ऑगस्ट रोजी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास कार्तिक संजय अवघडे वय १७, मूळ गाव दहिवडी, तालुका माण हा सध्या निरीक्षण बालगृहात होता. काल दि. 31 ऑगस्ट रोजी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञाताने त्याचे अपहरण केल्याची फिर्याद प्रवीण संभाजी साबळे वय 56 यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मेचकर करीत आहेत.