सातारा शहर परिसरात राहणाऱ्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा : सातारा शहर परिसरात राहणाऱ्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जितेंद्र जगन वासकले रा. जानाई मळाई सोसायटी, नवीन एमआयडीसी, कोडोली, सातारा याने राहत्या घराच्या हॉलमध्ये पंख्यास ओढणीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली. याबाबतची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास महिला पोलीस नाईक सुतार करीत आहेत.